रोटरी क्लबच्या निधीतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम

रोटरी क्लबच्या निधीतून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम

वावी । वार्ताहर | Vavi

नूतन विद्यालय व डॉ. रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात मुलींच्या सार्वजनिक शौचालयाचे (Public toilet) भुमिपूजन (bhumipujan) करण्यात आले. शौचालयाच्या उभारणीसाठी नाशिकरोड (nashik road) रोटरी क्लबने (Rotary Club) 16 लाख रुपयांचा निधी (fund) उपलब्ध करून दिला आहे.

क्लबच्या अध्यक्षा वर्षा जोशी, रोटरियन शंकर पाटील, फिरदोस कपाडिया, मुख्याध्यापक भाऊसाहेब कापडणीस यांच्या हस्ते भुमिपूजन (bhumipujan) करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष कन्हैयालाल भुतडा, उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य विठ्ठल राजेभोसले,

सरपंच संदीप राजेभोसले, माजी सरपंच रामनाथ कर्पे, विजय काटे, अशोक ताजणे, नंदलाल मालपाणी, कचरु घोटेकर, नवनाथ यादव, बाळासाहेब कहांडळ, विठ्ठल उगले, दिलीप कपोते, विजय गायकवाड, सचिन वेलजाळी, गुरुकुल प्रकल्पाचे उपाध्यक्ष संतोष भोपी, सुनील काटे, दिलीप खाटेकर उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ बॉक्सहिल सेन्ट्रल मेलबर्न ऑस्ट्रेलिया (Rotary Club of Boxhill Central Melbourne Australia) मार्फत जिल्हाभरात 19 शाळांमधील मुलींसाठी (students) शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी 80 टक्के निधी रोटरीचा तर 20 टक्के निधी शाळेचा असणार आहे. जिल्ह्यातील 17 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. सामाजिक दायित्व म्हणून रोटरी क्लबकडून जगभर विविध समाज घटकांसाठी उपक्रम राबविले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. शौचालयाचे बांधकाम (Construction of toilet) करुन ते शाळेकडे हस्तांतरित करण्याचे आमचे काम आहे. मात्र, या सुविधेचा योग्य पद्धतीने वापर, स्वच्छता व देखभाल करण्याची जबाबदारी सर्वतोपरी शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांची असणार असल्याचे कपाडिया यांनी सांगितले. विद्यालयास डिजिटल क्लासरुन उपलब्ध करुन देण्यासाठी रोटरीमार्फत स्मार्ट टीव्ही भेट देण्याचे आवाहन यावेळी पदाधिकार्‍यांना करण्यात आले.

रोटरीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उपलब्ध करून शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात. त्यातून सशक्त देश घडवणे हा उद्देश असल्याचे जोशी यांनी सांगितले. मुख्याध्यापक कापडणीस यांनी प्रास्ताविक केले. राजेभोसले, काटे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन उपशिक्षिका मनीषा सानप यानी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com