आश्रमशाळेचे बांधकाम बंद पाडले

आश्रमशाळेचे बांधकाम बंद पाडले

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka )शासकीय आश्रमशाळा पळसन (Government Ashram School Palasan )येथे आदिवासी विकास विभागातर्फे चालवल्या जाणार्‍या शासकीय आश्रमशाळा पळसन येथे संगणक प्रयोग शाळेचे इमारतीचे वनबंंधु कल्याण योजने मार्फत लाखो 4.99 कोटी रुपये नवीन इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असुन या इमारतीतचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या इमारतीत वापरण्यात येणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडरीत तसेच बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडगोट्याचा वापरत असल्याची तक्रार परिसरात नागरिकांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष चौधरी यांच्याकडे केली. गावित यांनी पळसन येथे बांधकामावर भेट दिली असता तेथे त्याना अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आढळून आले त्यांनी तात्काळ काम बंद पाडले.

संबंधित बाधकामात वापरण्यात येणारेसाहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे. बांधकामात वापरली जाणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर वापरली जात आहे. या शासकीय आश्रमशाळेत परिसरातील आदिवासी विद्यार्थी 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणून बांधकामावर परिसरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे हे बांधकाम चालू असताना आदिवासी विकास विभागाचे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खात्याचे अधिकारी तर एकदाही ढुंकूनही पाहिले नाही. अधिकारी आणि ठेकेदार याचे साटे लोटे झाले की काय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही ही पडक्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागेल कि काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे.

या आदिवासी मुलाच्या जिवाशी खेळ खेळणार याला जबाबदार अधिकारी व ठेकेदार अशी परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबधित इमारत बाधकामावर शासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्यात यावे, तसेच निकृष्ट दर्जाचे काम बंद करून निकृष्ट बांधकाम करणार्‍या व्यक्तीवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी सुभाष चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन जोपळे. हेमराज धूम यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

शासकीय आश्रमशाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) असुन बांधकामावर पाणी कमी प्रमाणात मारले जात आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट दिली असता त्यात तथ्य आढळून आल्याने विभागामार्फत व क्वालिटी कंटोल विभागामार्फत तपासनी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठेकेदार व अधिकार्‍यांवर करण्यात यावी.

सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com