मनमाड  : ५० खाटांच्या करोना उपचार केंद्राची निर्मिती
नाशिक

मनमाड : ५० खाटांच्या करोना उपचार केंद्राची निर्मिती

शॉपिंग सेंटरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आ. कांदे यांची माहिती

Abhay Puntambekar

मनमाड । प्रतिनिधी

मनमाड शहरात करोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य-प्रशासन यंत्रणेतर्फे प्रयत्न केले जात आहे. लवकरच शहरात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल, अशी माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली.

दरम्यान, पालिकेसाठी देखील नव्या मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती झाली असून एक-दोन दिवसात ते रुजू होतील, असे आ. कांदे यांनी स्पष्ट केले.

शहारतील आययुडीपी भागात नवीन शॉपिंग सेंटरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आ. कांदे बोलत होते. शहरात रोज बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे ही चिंतेची बाब असली तरी नागरिकांनी घाबरून जावू नये करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवाय रुग्णांचे हाल होऊ नये, त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी रेल्वे हॉस्पिटल ताब्यात घेवून तेथे कोविंड केअर सेंटर सुरु केले जाणार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

पालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेणकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंढे यांची नियुक्ती झालेली असून एक-दोन दिवसात ते रुजू होतील, असेही आ. कांदे यांनी सांगितले. आययुडीपी भागात नवे व्यापारी संकुल उभारले जात असून त्याच्या कामाचा दर्जा हा नक्कीच चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र पहिलवान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साईनाथ गिडगे यांचा आ. कांदे ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी तर संयोजन नगरसेवक महेंद्र शिरसाठ यानी केले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, सुनील पाटील पाटील, कैलास गवळी, बब्बू कुरेशी, अमीन पटेल, फरहान सय्यद, गालिब शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com