
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक (Construction Businessman) तथा कारडा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन नरेश कारडा (Naresh Karda) यांच्यासह चौघांवर शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी नरेश कारडा यांना सोमवारी रात्री उशीरा अटक (Arrested) करण्यात आली असून पुढील तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल जयप्रकाश लोनावत (वय ४१ , रा. वनराज सोसायटी,चंदन बंगला, रविंद्र हायस्कुल रोड, द्वारका, नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नरेश कारडा, मॅनेजिंग डायरेक्टर मनोहर कारडा, देवेश कारडा व संदिप शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल (Crime of Fraud) करण्यात आला आहे.
लोनावत यांनी नरेश कारडा यांच्या कारडा कन्स्ट्रकशनला (Karda Construction) डेव्हलपमेंटचे काम विश्वासाने दिले होते. त्या बांधकामाच्या बदल्यात लोनावतकडून कारडा यांनी ०१ कोटी २० लाख रुपये स्वीकारून बांधकाम देखील पूर्ण केले नाही. तसेच ही रक्कम लोनावत यांना परत न करता त्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.