उमराणेकरांना दिलासा; २० जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह
नाशिक

उमराणेकरांना दिलासा; २० जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह

घराघरात सर्वेक्षण सुरू : डॉ. सुभाष मांडगे

Abhay Puntambekar

उमराणे । वार्ताहर Umrane

उमराणे गावातील किराणा व्यापाऱ्याच्या घरातील ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसरात चिंतेचे वातावरण आहे त्यात व्यापाऱ्याच्या संपर्कांतील काल १७ जणांचे स्वॅब रिपोर्ट नाशिकला पाठवण्यात आले होते ते रिपोर्ट आज दुपारी प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

दरम्यान तापाचा संशय आला म्हणून मालेगाव येथे खाजगी लॅब मध्ये ३ जणांनी तपासणी करून घेतली होती तेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे उमराणेकरांना दिलासा मिळाला आहे तसेच जे देवळा येथे ३ रुग्ण कोविड सेंटरमध्ये आहेत त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ मांडगे यांनी दिली आहे.

दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावात १६ आशा सेविका कार्यकर्त्या घरोघरी जाऊन तपासणी व सर्वेक्षण करीत आहे आतापर्यंत ७ ते ८ हजार ग्रामस्थांची तपासणी झाल्याचे डॉ सचिन वैद्य यांनी माहिती दिली आहे. १४ दिवस हे सर्वेक्षण सुरूच राहणार आहे लोकांनी आजाराची माहिती न लपवता तात्काळ तपासणी करून घ्यावि असे आवाहन सरपंच लता देवरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com