वसुंधरेचे संवर्धन सर्वांची जबाबदारी

वसुंधरेचे संवर्धन सर्वांची जबाबदारी

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

पृथ्वीने माणसाचे जीवन परिपूर्ण केले आहे. अन्न, हवा, पाणी सर्व लागणार्‍या गोष्टी सजीव प्राण्यांना मुबलक प्रमाणात दिल्या आहेत. आपले सर्वस्व तिच्यामुळे आहे.

परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसांनी पृथ्वीच्या हवा (air), पाणी (water), नदी (river), वृक्ष (tree), डोंगर (Mountain), खनिजे, निसर्ग या घटकांचा विनाश मोठ्या प्रमाणत सुरू केल्याने सर्व सजीव सृष्टी अंधकारमय भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. हे रोखण्यासाठी सर्वांनी वसुंधरेची काळजी घेतली पाहिजे असे मत प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे (Principal Dr. Dilip Shinde) यांनी व्यक्त केले आहे.

मविप्रच्या (MVP) पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात (kk wagh college) राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.शिंदे बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य डॉ.सुनील आहिरे, उपप्राचार्य नवनाथ सोनवणे, प्रा.डॉ.उपेंद्र पठाडे, प्रा.सचिन कुशारे, प्रा.नारायण शिंदे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, जैविक शेतीचा (Organic farming) वापर वाढला पाहिजे. प्रत्येकाने फुले, फळे येणारी झाडे आपापल्या परिसरात लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे.

प्लास्टिकचा (Plastic) वापर कमीत कमी केला पाहिजे. नद्या प्रदूषित होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातून वाहनांमधून निघणारे अपायकारक वायू यांचे होणारे प्रदूषण नियंत्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले. भूगोल विभागप्रमुख प्रा.डॉ.उपेंद्र पठाडे यांनी पृथ्वीच्या निर्मितीचा इतिहास स्पष्ट करून जैव सृष्टीची संरचना विषद केली. उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे यांनी प्रास्ताविकात वसुंधरा दिनामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा.अल्ताफ देशमुख यांनी केले तर प्रा.सचिन कुशारे यांनी आभार मानले.

याप्रसंगी प्रा.हेमंत पाटील, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.डॉ.आशा कदम, प्रा.विलास जाधव, प्रा.डॉ. शोभा डहाळे, प्रा.राजेंद्र जाधव, प्रा.सचिन जाधव, प्रा.संपत खैरनार, प्रा.विष्णू राठोड, प्रा.प्राजक्ता देशमुख, प्रा.रणजित पवार, प्रा.जयश्री गोवर्धने, प्रा.बी.एल. कापडणीस आदींसह पिंपळगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.