नाशिक । Nashik

रामशेजवरील दुर्लक्षित असलेल्या दोन सैनिकी जोत्यांना उजेडात आणण्याचे कार्य शिवकार्य गडकोटच्या माध्यमातून करण्यात आले.

शिवकार्य गटकोट संस्थेची दुर्गसंवर्धन मोहीम नुकतीच रामशेजवर पार पडली. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या १२३ व्या दुर्गसंवर्धन श्रमदान मोहिमेत अजिक्य दुर्ग रामशेजवर झाली.

यावेळी माथ्यावरील मातीत बुजलेल्या,काटेरी झुडपात दडलेल्या सैनिकांच्या दोन जोत्यांचे दिवसभरातील श्रमदानातून त्यांच्या पाऊलखुणा नष्ट होण्यापासून वाचवण्याचे व त्यांना उजेडात आणण्याचे कामकाज दोन टप्प्यात झालेल्या अभ्यासपूर्ण श्रमदानातून करण्यात आले. रामशेजवरील प्लास्टिक व किल्ल्याची असुरक्षितता, दरवर्षी लागणारा वणवा, उपद्रवी तसेच प्रेमीयुगुलांची वाढती गर्दी यामुळे किल्ल्याचे वैभव दिवसेंदिवस खालावत चालले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवकार्यच्या माध्यमातून या गोष्टींना आळा घालण्यासाठी वेळोवेळी श्रमदान व जनजागृती केली जाते. तसेच स्थानिक पर्यटन पोलिस,रामशेज वनविभाग व स्थानिक आशेवाडी गावाने याकामी अधिक लक्ष घालावे अशी भावना ही यावेळी दुर्गसंवर्धकानीं यावेळी व्यक्त केली.

दरम्यान या मोहिमेत भवानी मंदिरासमोरील व उत्तरेकडील दोन सैनिकी जोत्यांचे अस्ताव्यस्त दगड, चिरे गोळा करत व्यवस्थित रचले. दरम्यान दुपारच्या सत्रात छोटी बालसंवर्धक स्वरा पिंगळे व शाहू पिंगळे याना संस्थेचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.

यावेळी शिवकार्यचे राम खुर्दळ, पर्यावरण समितीचे सागर शेलार, तुषार पिंगळे, श्रमदान समितीचे भूषण औटे, अमोल बच्छाव, रोहित गटकळ, जेष्ठ दुर्गसंवर्धक भाऊसाहेब चव्हाणके, पंकज ठाकरे, प्रचार-प्रसार कमिटीचे आशिष प्रजापती, प्रसाद भामरे, नवनाथ कालेकर, आदी दुर्गसंवर्धक सहभागी झाले होते.