नाशिक । Nashik
नाशिक जिल्हा रुग्णालयात धोबी (लॉड्री) काम करणारे १४ कामगारांना कुठलीही पुर्व सुचना न देता कामावरून काढून टाकले आहे.त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी अनुसूचित जाती विभाग नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटी ग्रामीणतर्फे गुरुवारी (दि.१७) जिल्हा रुग्णालयासमोर, गोल्फक्लब मैदान येथे सकाळी ११ वाजेपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात धोबी (लॉड्री) काम करणारे १४ कामगारांना कुठलीही पुर्व सुचना न देता कामावरून काढून टाकले आहे.करोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेण्याचे कामगार उपायुक्त यांचे स्पष्ट आदेश असतानाही ठेकेदाराकडून चालढकल होत आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या विरोधात धोबी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कॉंग्रेसचे आजी-माजी खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, एनएसयुआय, अल्पसंख्याक, ओबीसी, अनुसूचित जमाती, असंघटित कामगार आदी विभागांचे सर्व प्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मिडीया सेल, किसान सेल अश्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अनुसूचित जाती विभाग
नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले आहे.