काँग्रेसची कोविड सहायता केंद्रे तालुका स्तरापर्यंत सक्रीय

काँग्रेसची कोविड सहायता केंद्रे तालुका स्तरापर्यंत सक्रीय

रक्तदान शिबिरांचेही आयोजन करणार


नाशिक । Nashik
करोनाच्या आपत्तीत काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असून कोविडच्या दुसऱ्या लाटेत नागिराकांच्या मदतीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात कोविड सहायता केंद्राची स्थापना केली आहे.नाशिक जिल्ह्यातही अशाप्रकारचे काम केले जाणार आहे.

या केंद्रामार्फत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लोकांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.वैद्यकीय मदतीसोबतच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तसंकलन करण्याचे कामही जोमाने सुरु आहे. हे कार्य आता तालुकास्तरापर्यंत नेण्यात येणार आहे.राज्यभरातील कोविड सहायता केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी टिळक भवन,मुंबई येथील कंट्रोल रूममध्ये मंगळवारी(दि.२७) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, डॉ. गजानन देसाई, टिळक भवन येथील मुख्य कोविड सहायता मदत केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रदेश सचिव राजाराम देशमुख. डॉ. संजय लाखे पाटील, झिशान अहमद आदी सहभागी झाले होते.

बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर कोविड मदत केंद्र स्थापन करणे व प्रत्येक केंद्रात टिम नेमणे, लोकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत कशी पुरवता येईल तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या संपर्कात राहून आवश्यक असेल तेथे रक्तदान शिबिरे आयोजित करणे, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.


जिल्हा स्तरावर सुरु असलेल्या या मदत केंद्राच्या कामाची माहिती यावेळी घेऊन हे कार्य तालुकास्तरापर्यंत पोहचवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मदत कार्यात ज्या अडचणी येतील त्या राज्य स्तरावरील केंद्राला कळविल्या जातील व त्या समस्या सोडवण्याचे काम केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com