
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) झालेल्या स्मार्ट सिटी योजना (Smart City Scheme) तसेच प्रशासन आल्यानंतर
होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या (Corruption) विरोधात काँग्रेस पक्ष (Congress party) लवकरच शहरात आवाज उठवणार असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी डॉक्टर राजीव वाघमारे (State Congress in-charge Doctor Rajeev Waghmare) यांनी व्यक्त केले.
गेल्या काही दिवसापासून शहरांमध्ये महानगरपालिकेच्या विविध योजनांमध्ये भरपूर भ्रष्टाचार (Corruption) झाला आहे. तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी सभागृहामध्ये तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहाच्या बाहेर हा भ्रष्टाचार जनतेच्या समोर उघड केलेला आहे व दोषींवर कारवाई व्हावी म्हणून काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असल्याचे मत डॉ. राजू वाघमारे यांनी नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या (Nashik City Congress Committee) पदाधिकारी व कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले.
नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व आघाड्या सर्व विभाग व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाड्या, विभाग मजबुतीने भविष्यात काम करतील जुन्या पदाधिकाऱ्यांसमवेत नवीन पदाधिकाऱ्यांनाही सामावून घेऊन विविध प्रकारची जबाबदारी देण्यात येईल व आगामी काळात प्रत्येक प्रभागात उमेदवारांची चाचणी करण्यात येईल, असे उद्गार त्यांनी काढले.
बैठकीमध्ये राजू वाघमारे व ब्रिज किशोर दत्त यांनी शहरातील सर्व आघाडी व विभाग प्रमुखांची मते जाणून घेतली. बैठकीचे प्रास्ताविक नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले. शहरातील काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येणारे आगामी कार्यक्रम, उपक्रम याबाबतीत छाजेड यांनी माहिती दिली. पक्षाची लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर होईल, असे उद्गारही आकाश छाजेड यांनी काढले.
बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव नगरसेवक राहुल दिवे, नंदकुमार कर्डक, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, नगरसेविका आशाताई तडवी, नगरसेविका वत्सलालाई खैरे, शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला सिराज कोकणी, माजी उपमहापौर गुलाम शेख, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, जावेद इब्राहिम, अल्तमश शेख, बाळासाहेब कासार, भरत पाटील, सुनील भाऊ आव्हाड, गौरव सोनार, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, किरण जाधव, राहुल कोकणी, नितीन काकड, कामिल इनामदार, चारुशीला काळे, डॉ.सुचिता बच्छाव, दिनेश उनवणे, संतोष नाथ, कल्पना पांडे, जुली डिसूजा, कुसुम चव्हाण, अरुणा आहेर, गुडी खान, समीना पठाण, साजिया शेख, चारुशीला शिरोळे, सोफिया सिद्दिकी, कृष्णा नागरे, अरुण दोंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन जावेद इब्राहिम यांनी केले.