शरद पवारांनंतर आता नाना पटोलेही नाशकात; 'हे' आहे कारण

माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरातांची उपस्थिती
शरद पवारांनंतर आता नाना पटोलेही नाशकात; 'हे' आहे कारण

नाशिक । Nashik

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (State President Congress) आ. नाना पटोले (Nana Patole) व कॉंग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या (Nashik City & District Congress Committee) वतीने रविवारी ( दि.३१) ३ वाजता तुपसाखरे लॉन्स, मुंबई नाका (Mumbai Naka) नाशिक (Nashik) येथे मेळावा व आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे...

या बैठकीच्या नियोजनाबाबत शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने नाशिक कॉंग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त (Breez Dutt) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवन महात्मा गांधी रोड नाशिक येथे बैठक संपन्न झाली.

बैठकीचे प्रास्ताविक करताना शरद आहेर यांनी सांगितले की, ९ - १५ ऑगस्ट दरम्यान होणा-या "आझादी की गौरव पदयात्रा" (Azadi Ki Gaurav Padayatra) निमित्ताने पंचवटीतून गांधी ज्योत ह्या ठिकाणावरून पदयात्रेला सुरुवात होईल.या दरम्यान नाशिक शहरातील सर्वच प्रभागातून ७५ किलोमीटर अंतर सर्वच नेते, पदाधिकारी ह्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच स्वातंत्र्य चळवळीत योगदान असलेल्या कुटुंबियांच्या भेटी देखील घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वांतंत्र्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाला भेटी दिल्या जातील.

तसेच महानगरपालिका निवडणूकीत (Municipal Election) इच्छुक उमेदवार आपपल्या प्रभागात ह्या पदयात्रेचे स्वागत करतील. चौकाचौकात पत्रक, बॅनर, झेंडे लावुन वातावरण निर्मिती केली जाईल यावर पदाधिकाऱ्यांनी तयारी करण्याचे आवाहन आहेर यांनी केले. प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले व कॉंग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी करुन अधिकाधिक लोकांना या मेळाव्यात सहभागी करावे, असे ब्रीज दत्त यांनी सांगितले ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

दरम्यान, यावेळी माजीमंत्री डॉ शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) शाहु खैरे (Shahu Khaire) वत्सला खैरे, राहुल दिवे, सुरेश मारु, विजय राऊत, वसंत ठाकुर, ज्ञानेश्वर काळे, हनिफ बशीर, स्वप्निल पाटील आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी विजय पाटील, भरत पाटील, कैलास कडलग, ईशाक कुरेशी, जावेद पठाण, अरुण दोंदे, फारुख कुरेशी, दाऊद शेख, गौरव सोनार, देवेन मारु, रामकिसन चव्हाण, नितिन अमृतकर, सलिम शेख, उषा साळवे, अरुणा अहिरे, समिना पठाण, शबाणा अत्तार, साजिया शेख, सिध्दार्थ गांगुर्डे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com