राज्यपालांचे वक्तव्य दुर्लक्षित करण्यासाठी भाजपची खेळी - नाना पटोले

राज्यपालांचे वक्तव्य दुर्लक्षित करण्यासाठी भाजपची खेळी - नाना पटोले

नाशिक । Nashik

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राला (Maharashtra) बदनाम करण्याचे काम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले असून राज्यपालांच्या वक्तव्यावरील लोकांमधील असलेली चीड दुर्लक्षित करण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोटे आरोप लावून ईडीची कारवाई करण्यात आली अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी दिली आहे...

आज नाशिकमध्ये (Nashik) कॉंग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ईडीच्या कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार (BJP Government) हे भीतीचे राजकारण करत असून ते लोकशाहीला घातक आहे. याशिवाय ज्या लोकांवर ईडीची कारवाई (ED action) होते, त्यानंतर ते लोक भाजपमध्ये जातात त्यांच्यावर नंतर कारवाई का होत नाही असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले, ईडीची कारवाई होऊन जे लोक भाजपमध्ये आले त्यांचे काय शुद्धीकरण केले हे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेला सांगितले पाहिजे,असे पटोले म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Deputy CM Devendra Fadnavis) विधानसभेत सांगितले आहे की हे ईडीचे सरकार आहे. तसेच ज्या लोकांवर ईडीची कारवाई होऊ शकत नाही त्या लोकांना पैशाचे प्रलोभन दाखवायचे असेही पटोले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com