आम्ही दगा देणारे नव्हे तर सोबत घेऊन चालणारे; नाना पटोलेंचा भाजपला टोला

आम्ही दगा देणारे नव्हे तर सोबत घेऊन चालणारे; नाना पटोलेंचा भाजपला टोला

नाशिक | Nashik

आम्ही मित्र घेऊन चालणारी लोक असून मित्रांना दगा देणारे नाही. तसेच आम्ही जोडण्याचे काम करत असून आमचा प्रमुख विरोधक असलेला भाजप (BJP) पक्ष तोडण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. पटोले आज नाशिक (Nashik) येथे आझादी गौरव यात्रेच्या (Azadi Gaurav Yatra) निमित्ताने आले असता माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते...

यावेळी बोलतांना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षापासून बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार (Nitish Kumar) बाजूला झाले. भाजप पक्षापासून लोक दूर होत चालले आहेत. कॉंग्रेस (Congress) समवेत जोडलेली लोक आजही पक्षासमवेत असून काँग्रेस हा जनतेतला पक्ष असल्याने निश्चितपणे काँग्रेस सोबत जनता आहे असे पटोले म्हणाले. तसेच भाजपने राजकीय व्यवस्थेमध्ये नंगा नाच सुरू केला आहे अशी गंभीर टीकाही पटोले यांनी केली.

पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) विपरीत परिस्थितीत निर्माण झाली. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मविआच्या निर्णयास संमती दिली. महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीस आमच्या पक्षाचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) गेले होते. मी आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आम्ही दोघे पद यात्रेत आहोत. खरंतर १६ तारखेला बैठक होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मित्रपक्षांना फॉरमॅलिटी पाळायची नसेल तर ठीक आहे कोणावर जबरदस्ती नाही असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com