काँग्रेसचे तहसीलसमोर आंदोलन; निवेदन देत महागाईचा निषेध

काँग्रेसचे तहसीलसमोर आंदोलन; निवेदन देत महागाईचा निषेध

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या (inflation) विरोधात तालुका कॉग्रेस पार्टीच्यावतीने (Taluka Congress Party) तहसील कार्यालयासमोर (Tehsil Office) निषेध आंदोलन (agitation) करत तहसिलदारांना निवेदन (memorandum) दिले.

भाजप सरकारच्या (bjp government) चुकीच्या धोरणामुळे व नियोजन शुन्य कारभारामुळे देशात महागाईचा (inflation) भडका उडाला आहे. राज्यात व संबंध देशात शेतकर्‍यांच्या (farmers) शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.

सततच्या पावसाने शेतमाल खराब होत आहे. शेतकर्‍यांना पिक कर्जासाठी (crop loan) बॅकांच्या पायर्‍या झिजवून अनेकांना कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे व बँकांकडून होणारी शेतकर्‍यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी निवेदनात (memorandum) करण्यात आली.

केंद्र शासनाकडून (central government) सतत होणारी पेट्रोल (petrol) व डिझल भाववाढ (Diesel price hike) होत असल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून पून्हा ग्रामीण भागात (rural area) पून्हा महिलांनी चूल पेटवत गॅस भरणे बंद केल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीयकृत बॅकांकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना (Educated unemployed youth) कर्ज देतांना जे टाळाटाळ होत असल्याने तरुणांना चिंताग्रस्त आहेत. महागाई (inflation), बेरोजगारी (Unemployment) व जिवनावश्यक वस्तुवरील वाढलेला जी. एस. टी.मुळे (GST) सर्वसामान्यांचे जगणेच मुश्किल होत आहे.

त्यामुळे शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना हेक्टरी 75 हजार रुपयाची आर्थिक मदत (financial aid) द्यावी, पिक कर्ज माफ करावे, फळ बागायतदारांना भरीव मदत द्यावी, खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी, शेतकर्‍यांना विज बीला संदर्भात सवलत मिळावी. शेतकर्‍यांना विज पुरवठा सुरळीत करावा अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, संतोष जोशी, महिला तालुकाध्यक्ष नंदा पडवळ, दिनेश चोथवे, अश्याक शेख, भाऊसाहेब शेळके, बाळासाहब शिंदे, उदंय जाधव, जाकिर शेख, रत्नमाला मोकळ, अंबादास भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com