काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा

काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा
देशदूत न्यूज अपडेट

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

नाशिकरोड़ ब्लॉक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष दिनेश निकाळे, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव जावेद पठाण यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात मोटरसायकलची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले...

यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार चले जावो, वाह रे मोदी तेरा खेल...सस्ती दारू महंगा तेल, अशा घोषणा देण्यात आल्या.

असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ढकोलिया, सुनील निरभवने, मोबिन पठाण, सलमान शेख, अल्पसंख्याक ब्लॉक अध्यक्ष तोफिक शेख, अजीज खान, तोफीक पठाण, सुनिल रिपोर्टे, तनवीर शेख, आकाश बागुल, देविदास गायकवाड़, किरण त्रिभुवन, योगेश निरभवने, कृष्णा हिरे, प्रकाश वाघमारे, राजु व्यवहारे, अदनान पठाण, संतोष गिरजे, मांगीलाल जोगदंड आदी यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com