Nashik News : व्यावसायिकांवर सक्तीची कारवाई थांबवा; काँग्रेस पदाधिकार्‍यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Nashik News : व्यावसायिकांवर सक्तीची कारवाई थांबवा; काँग्रेस पदाधिकार्‍यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

यंत्रमागाचे मॅचेस्टर म्हणून शहराची ओळख आहे. येथे दिवसा व रात्री २४ तास यंत्रमाग-साईजिंग सुरू राहत असतात. रात्रपाळीत काम करणारे कामगार रात्री चहा व नाश्त्यासाठी हातगाड्यांवर किंवा हॉटेलवर जात असतात. मात्र पोलिसांतर्फे (Police) रात्री ११ वाजेनंतर हातगाडी किंवा दुकान चालकांवर सक्तीने कारवाई केली जात असल्याने कामगारांचे हाल होत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. रोजगारासाठीच (Employment) कामगार रात्रपाळीत देखील काम करत आहेत. त्यामुळे रात्री ११ वाजेनंतर पोलिसांतर्फे होत असलेली सक्तीची कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी महानगर काँग्रेसतर्फे (Congress) करण्यात आली आहे...

अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती (Upper Superintendent of Police Aniket Bharti) यांना पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेली रात्री ११ वाजेनंतरची सक्तीची कारवाई त्वरीत थांबवावी या मागणीसंदर्भात महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत अधीक्षक भारती यांना शहरातील परिस्थितीची माहिती देण्यात आली. दिवसा व रात्री २४ तास यंत्रमाग येथे सुरू राहतात. हिंदू-मुस्लीम बांधवांचे (Hindu-Muslim Brothers) सण एकत्रितरित्या येत असल्याने कामगार जादा तास काम करीत आहेत. रात्रपाळीत काम करणारे कामगार चहा, पान तसेच नाश्त्यासाठी हातगाडी व खानावळीमध्ये जात असतात. मात्र पोलिसांनी रात्री ११ वाजेनंतर हातगाडी व खानावळी सुरू ठेवणार्‍यांवर कारवाई करणे सुरू केले आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सविता गर्जे (Savita Garge) यांनी हातगाडी चालकांना मारहाण करत रात्री ११ नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे दुकाने बंद होत असली तरी यंत्रमाग कामगारांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हातगाडी व हॉटेलवर कामगार नाश्ता, जेवण अथवा चहापानासाठी जात असतात. पोलिसांनी रात्री ११ वाजेनंतर सुरू केलेली सक्तीची कारवाई थांबवण्याची मागणी एजाज बेग यांनी केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जमील क्रांती, जैनुलआबदीन पठाण, हाशीम अन्सारी, मन्सुरी, शेख मन्सान, अब्दुल कय्युम, मोहंमद साबीर, शेख मुक्तार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com