काँग्रेसच्या सभासद नोंदणीस प्रारंभ

काँग्रेसच्या सभासद नोंदणीस प्रारंभ

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुका (dindori taluka) राष्ट्रीय काँग्रेसची (Congress) सभासद नोंदणी (Member registration) सुरु झाली असून सभासद नोंदणीचे उद्घाटन आमदार डॉ. सुधीर तांबे (mla dr. sudhir tambe) यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षांची ध्येयधोरणे सांगितले. दिंडोरी शहराच्या विकासासाठी काँग्रेसने आतापर्यंत योगदान दिले आहे.

यापुढील काळातही गोरगरीब जनतेसाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील. काँग्रेस नेतृत्वच देशाला प्रगतीपथावर नेतील असे तांबे म्हणाले. तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड म्हणाले की, सर्व सामान्य जनतेला केंद्र सरकारने (central government) जगणे मुश्किल केले असून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ केल्याने सर्व सामान्यांना महागाईला (Inflation) तोंड द्यावे लागत आहे.

केंद्र सरकारने लवकरच महागाईवर अंकुश न ठेवल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल व जनआंदोलन उभे करेल, असा इशारा सुनील आव्हाड यांनी दिला. याप्रसंगी सभासद पावती आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेविका शैला उफाडे, शहराध्यक्षा निकीता बावा, वाळू जगताप, गुलाबराव जाधव, प्रकाश पिंगळ, दिलीप शिंदे, दिप्ती गायकवाड, कचरु गांगोडे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com