काँग्रेस सभासद नोंदणीस प्रारंभ

तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत जनजागृती निर्णय
काँग्रेस सभासद नोंदणीस प्रारंभ

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुका (sinnar taluka) काँग्रेस कमिटीच्या (congress Committee) नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्य नोंदणीस (Member registration) प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते (Congress workers) व पदाधिकार्‍यांनी आपापल्या भागात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी अभियान राबवण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी केले. शेतकरी (farmers) विरोधी कायदा रद्द झाल्याने पदाधिकार्‍यांनी यावेळी जल्लोष करत नागरिकांना लाडू वाटप केले.

भाजप सरकारला (bjp government) सत्तेवरुन दूर करण्यासाठी ‘जनजागरण अभियाना’ द्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. संपुर्ण तालुक्यात हा उपक्रम राबवण्यासाठी पदाधिकार्‍यांनी मेहनत घेण्याचे आवाहन सांगळे यांनी केले. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, तालुका समन्वयक उदय जाधव,

शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका महिलाध्यक्षा नंदा पडवळ, शहराध्यक्षा रत्नमाला मोकळ, योगिता मोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे, रावसाहेब थोरात, ज्ञानेश्वर लोखंडे, सुनील सोनवणे, रतन तुपे, वामनराव उकडे, गोरक्षनाथ पडवळ ,राजेंद्र जारे, संजय गेठे, कैलास लवंगे, तेजस आव्हाड, शाहरुख सय्यद, शब्बीर सय्यद, दामू शेळके, सलीम शेख, संजय बरडे, शेख जाकीर, ज्ञानेश्वर पवार, सचिन नाईक, सागर जाधव, भावेश शिंदे, हेमंत क्षीरसागर उपस्थित होते.

कृषी कायदा रद्द झाल्याने जल्लोष

कृषी कायद्याविरोधात (agricultural Law) गेल्या काही महिन्यांपासून उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांना काँग्रेस पक्षाने (Congress party) सुरुवातीपासूनच पाठींबा दिला होता. आज त्यांच्या लढ्याला यश मिळाले. काँग्रेस पक्षाने कायम शेतकर्‍यांच्या बाजूने भूमिका लावून धरल्याने भाजपा सरकारने हे कृषी कायदे रद्द केले आहेत. त्यामुळे हा खरा विजय काँग्रेस पक्षाचा असल्याचे सांगळे म्हणाले. पदाधिकार्‍यांनी जल्लोष करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (chatrapati shivaji maharaj) पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन परिसरात लाडूचे वाटप केले.

महिला उपाध्यक्षपदी सुनीता घायाळ

बैठकीमध्ये महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी भरतपूर येथील सुनिता घायाळ यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक सेलच्या तालुका सरचिटणीसपदी जाकीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. तालुक्यात पक्षाच्या बांधणीसाठी सर्वतोपरी काम करणार असल्याचे घायाळ व शेख यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com