बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र खरेदीची चौकशी करावी; काँग्रेसची मागणी

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र खरेदीची चौकशी करावी;  काँग्रेसची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा रुग्णालयातील (District Hospital) आंतरजिल्हा बदली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर (Fake Medical Certificate) सही करणाऱ्या अधिका-यांची व वैद्यकीय उपकरण व औषध खरेदीबाबत सखोल चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा कॉंग्रेस (Nashik District Congress) अनुसूचित जाती विभागाने (Scheduled Castes Department) दिला आहे...

जिल्हा रुग्णालयात जिल्हा अंतर्गत बदलीसाठी चुकीच्या पद्धतीने कुठलेही निकष न तपासता केवळ पैश्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जातात हे पोलिसांना (Police) दिल्या गेलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन सिध्द झाले आहे. त्याबाबत गुन्हाही दाखल झाला आहे.परंतु जे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले गेले ते कोणाच्या सहीने दिले गेले. त्या संबंधित अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. हे प्रकरण अंत्यंत गंभीर असून खुप वर्षांपासून हे सर्रास सुरू असल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीचीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे

जिल्हा रुग्णालयात ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारी उपकरणे ही निकृष्ट दर्जाची (Inferior quality) असल्याचेही समोर आले आहे. केवळ उपकरणेच नाही तर औषधं खरेदीत देखील कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत उचित कारवाई न झाल्यास नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन (Movement) करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे (Dnyaneshwar Kale,) सुरेश मारु, अरुण दोंदे, विलास बागुल, संजय खैरनार, अॅड विकास पाथरे, अशोक शेंडगे, प्रा. प्रकाश खळे, अमोल मरसाळे, दिलावर मनियार, सुंदर साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com