अग्निपथ योजना रद्द करण्याची काँग्रेस मागणी; अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अग्निपथ योजना रद्द करण्याची काँग्रेस मागणी; अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मालेगाव । तिनिधी | Malegaon

केंद्र सरकारने (Central Government) लागू केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Yojana) आज काँग्रेसतर्फे (congress) अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Upper Collector's Office) निदर्शने करण्यात येऊन

नायब तहसीलदार तुपे (Deputy Tehsildar Tupe) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले. अग्निपथ योजना देशातील बेरोजगार तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी ठरेल, त्यामुळ ही योजना रद्द करून पुर्वीप्रमाणेच सैन्यदल भरती प्रक्रिया (Army recruitment process) राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा (congress) विरोध असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले (State President MLA Nana Patole) यांच्या आदेशान्वये राज्यभर निदर्शन, आंदोलन (agitation) केले जात आहे. त्याअनुषंगाने मालेगाव तालुका (malegaon taluka) काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे व तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करत नायब तहसीलदार तुपे यांनानिवेदन देण्यात आले.

भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत (Recruitment process in the Indian Army) बदल करून केंद्रातील भाजप सरकारने (BJP government) नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केलेली आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात देशात तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने वारंवार रोजगारांची (employment) खोटी आशा दाखवून देशातील तरुणांना बेरोजगारीच्या (Youth unemployment) अग्निपथवर चालण्यास भाग पाडले आहे.

केंद्र सरकारने ठेका पद्धतीवर आणलेली अग्निपथ योजना तरुणांच्या भावनांशी खेळणारी असून त्यांना चार वर्षानंतर काही लाख रुपयांचे अमिष दाखवून त्यांचे पुढील आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे. तरुण हाच देशाचा कणा असून तो मोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये. तरुणांचे आयुष्य बरबाद करणार्‍या अग्निपथ योजनेला पूर्णत: विरोध असून सदर योजना रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, काळू सावंत, माणिक अहिरे. दत्तात्रेय खैरनार, सतीश पगार, डॉ. ज्ञानेश्वर भामरे, दीपक बच्छाव, एकनाथ कन्नोर, श्रीराम हाके, प्रदीप अहिरराव, पोपट बोरसे, दत्तात्रेय वडक्ते, नीलेश थोरात, वसंत शेवाळे, राजेश पगार, साहेबराव बच्छाव, मंगला तलवारे, शैला सोनवणे, नितीन बच्छाव, डॉ. महेंद्र शिरोळे, संदीप निकम, युवक काँग्रेस अध्यक्ष सुमित निकम, मनोहर सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com