Video : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची 'सायकल रॅली'

Video : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची 'सायकल रॅली'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेट्रोल-डीझेल (Petrol-diesel price hike) दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार (Central Government) विरोधात आज नाशिक काँग्रेसच्या वतीने (Congress) 'सायकल रॅली' (Cycle rally) काढत आंदोलन करण्यात आले...

गेल्या काही दिवसांपासून भाजपा (Bharatiya Janata Party) सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केली आहे. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. देशात सुमारे एक ते दीड वर्षापासून करोनामुळे (Corona) आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे जनतेच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

त्यात भरमसाट महागाईने डोके वर काढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीत घट करून सर्व सामान्यांना दिलासा द्यावा, असे निवेदन नाशिक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com