ईडीविरोधात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ईडीविरोधात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीमार्फत (ED) चौकशी सुरु आहे. या प्रकरणावरून काँग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला आहे. देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा (Central Government) निषेध व्यक्त करत आहे....

आज नाशिक शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनपासून (Congress Bhavan) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (Collector Office) मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने (Agitation) करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher), प्रदेश सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav), प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील (Hemlata Patil), आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar), गटनेते शाहू खैरे, माजी नगरसेविका वत्सला खैरे, ग्रामीण कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, मध्य नाशिक ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष निलेश खैरे, सुरेश मारू, उद्धव पवार, वसंत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com