
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अदानी समूहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी म्हणून नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एलआयसी ऑफिस, गडकरी चौक, नाशिक येथे आंदोलन करण्यात आले...
केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यावधी रुपये गुंतवण्यास मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे 39 कोटी गुंतवणूकदारांचा व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का? अशी भीती निर्माण झाली असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त हेमलता पाटील, गटनेते शाहू खैरे, उद्धव पवार, बबलू खैरे, विजय पाटील, स्वप्नील पाटील, अण्णा मोरे, शरद बोडके, अनिल बहोत, राजकुमार जेफ, वैभव शेलार, दाऊद शेख, इमरान अन्सारी, पवन भगत, जावेद शेख, जावेद पठाण, अनिल बेग, राजेंद्र सोनवणे, गोपाळ जगताप आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.