
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर ईडीकडून (ED) होत असलेल्या चुकीच्या कारवाईविरोधात नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) धरणे आंदोलन (Agitation) करण्यात आले...
सोनिया गांधी जिंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है, अशा घोषणांनी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सोनिया गांधी या कधीही अशा कारवाईला भिक घालणार नाहीत, अश्या प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकारांनी दिल्या.
यावेळी शाहु खैरे, हेमलता पाटील, राहुल दिवे, वत्सला खैरे, सुरेश मारु, ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र बागुल, लक्ष्मण जायभावे, आशा तडवी, उध्दव पवार, बबलु खैरे, दिनेश उन्हावणे, हनिफ बशीर, स्वप्निल पाटील, जावेद पठाण, सोमनाथ मोहिते, अशोक शेंडगे, अरुण दोंदे, वसंत ठाकुर, गौरव सोनार, आप्पा गवळी, ईशाक कुरेशी, अब्दुल बाबा, समीना पठाण, एलिझा बेथ, आशा मोहिते, सिध्दार्थ गांगुर्डे, गोपाळ जगताप आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.