
नाशिक | प्रतिनिधी Nashik
केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) चुकीच्या धोरणाच्या विरोधात नाशिक शहर कॉंग्रेसचे (Nashik City Congress) वतीने शरद आहेर (Sharad Aher) यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन (Congress Bhavan), महात्मा गांधी रोड (MG Road Nashik) येथे केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन (Agitation) करण्यात आले....
तसेच आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. निवेदनात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड प्रमाणात महागाई (Inflation) वाढली असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीतही प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला असल्याचे म्हटले आहे.
तसेच देशातील तरुण पिढी बेरोजगार होत असुन बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना रोजगार मिळेल अशी कोणतीही ठोस उपाययोजना केंद्र सरकारकडे नसल्यानेच तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मोदी सरकारने (Modi Government) अगदीच घाईघाईने आणलेली अग्निपथ योजना म्हणजे युवकांचे भवितव्य अधांतरी करण्याचं काम असुन याबाबत पृर्णविचार करुन ही योजना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जीवनावश्यक वस्तुवर जी.एस टी. (GST) म्हणजे देशातील गोरगरीब जनतेची लुट असल्याने किमान यांचा कमीतकमी विचार करायला हवा होता तसा तो न करता. मोदी सरकार महागाई, बेरोजगारी (Unemployment), अग्निपथ योजना (Agnipath Scheme) आणि जीवनावश्यक वस्तूवर लावण्यात आलेला जी.एस.टी. मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शरद आहेर डॉ शोभा बच्छाव, डॉ हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, वसंत ठाकुर, सुरेश मारु, राजेंद्र बागुल, राहुल दिवे, निलेश खैरे, हनिफ बशीर, ज्युली डिसुझा, ईशाक कुरेशी, विजय पाटील, दिनेश निकाळे, सोमनाथ मोहिते, स्वप्निल पाटील, कैलास कडलग, किरण जाधव, अशोक शेंडगे, भरत पाटील, जावेद पठाण, अनिल बहोत, कैलास महाले, नागरगोजे सर, अरुणा आहेर, समिना पठाण, शबाना अत्तार, सिध्दार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, दिलीप गांगुर्डे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.