केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन

महागाईविरोधात पुन्हा आंदोलन छेडणार : आव्हाड
केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलन

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

केंद्र सरकारने (central government) डिझेल (Diesel), पेट्रोल (Petrol), गॅसच्या (Gas) किमंती वाढविल्याने व महागाईच्या (Inflation) निषेधार्थ दिंडोरी (dindori) शहरात तालुका काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुका (dindori taluka) काँग्रेसचे अध्यक्ष सुनील आव्हाड (sunil avhad) यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा संपन्न झाला. निळवंडी रस्त्यावरुन निषेध मोर्चाला सुरुवात झाली. चौकात घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) यांना निवेदन (memorandam) देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे (mla sudhir tambe) यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. गेल्या पाच वर्षात महागाई प्रचंड वाढून गेली.

शेतकर्‍यांचे (farmers) हाल झाले. यात गॅस, डिझेल, पेट्रोलचे किमंती वाढवल्या. सामान्य जनतेला होणार्‍या या त्रासात केवळ केंद्रातील केंद्र सरकार जबाबदार असून जनतेने महागाईचा निषेध करावा, असे आवाहन आ. डॉ. तांबे यांनी केले. यावेळी सुनील आव्हाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारने गोरगरीब जनतेचे हाल केले असून त्यामुळे सामान्य जनतेला व्यवहार करणे अवघड झाले आहे.

केंद्र सरकार हे भांंडवलदारांचे सरकार असून या सरकारने सामान्यांचा कोणताही विचार केला नाही. केंद्र सरकारने गोरगरीबांचा विचार न केल्यास काँग्रेसच्या वतीने अजून तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल, असा इशारा सुनील आव्हाड यांनी दिला. यावेळी वाळू जगताप, रा. कॉ. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, काँग्रेसचे शहराध्यक्ष गुलाब जाधव, शैला उफाडे, प्रकाश पिंगळ, दिलीप शिंदे, कचरु गांगोडे, निकीता बावा आदींनी केंद्र सरकारचा निषेध केला.

रॅलीचा समारोप तहसील कार्यालय आवारात झाला. याप्रसंगी पंडीतराव गायकवाड, दिलीप बोडके, दिप्ती गायकवाड, जयराम गवळी, मोहन महाले, दशरथ महाले, शांताराम खांडवी, धर्मराज जोपळे, अनिल पिंगळे, राजेंद्र देशमुख, सुमनबाई घोरपडे, कविता सावंत, आशा झोटींग, अनुसया महाभाव, सोमनाथ मोहिते, पोपट चौघुले, दत्तात्रय ढाकणे, साहेबराव ढाकणे, निवृत्ती कथार,

वेड्डू ढाकणे, आसिफ अत्तार, जावेद अत्तार, शाकीर तांबोळी, दिलीप देशमुख, लक्ष्मण पवार, पारुबाई डंबाळे, आशा झोटींग, अशोक गांगुर्डे, रेखा गांगुर्डे, शांताराम पगार, शंकुतला सोळसे, मनिषा शेखरे, रत्ना बदादे, ज्योती जाधव, सविता नाईक, रेखा मंजूळकर, यशोदा वारकरी, शंकर ठाकुर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com