मिशन सुरगाणा टीमच्या डॉक्टरांचे अभिनंदन

मिशन सुरगाणा टीमच्या डॉक्टरांचे अभिनंदन

नाशिक । प्रतिनिधी

करोना काळात आदिवासी बांधवांसाठी आयुर्वेद उपचार पद्धतीची चांगली मदत होत आहे. सुरगाणा तालुक्यातील डॉक्टरांनी हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवला. त्याला चांगले यश आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय करोना उपाय आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ यांनी स्वतः वैद्य विक्रांत जाधव यांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीला मिळालेले यश आणि सुरगाणा तालुक्यातील डॉक्टरांचा सहभाग याबद्दल माहिती दिली.

तसेच सुरगाणा तालुक्यात मिळालेल्या यशामुळे जिल्ह्यातील इतर आदिवासी भागात आयुर्वेदीय उपचार सेवेचा विस्तार करण्यास सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आणि आरोग्य सह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सुरगाणा तालुक्यातील डॉक्टरांनी केलेल्या सुश्रुषेची माहिती बैठकीत दिली.

Related Stories

No stories found.