पोलिस आयुक्तांवर अभिनंदनाचा वर्षाव

पोलिस आयुक्तांवर अभिनंदनाचा वर्षाव

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या वर्षभरापासून नाशिक शहर Nashik City हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया Crime होत असताना मंगळवारी शहरात केवळ एकाच पोलीस ठाण्यात एक माञ गुन्हा दाखल झाल्याची दुर्मिळ घटना घडल्याने पोलीस दलाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्त दीपक पांडे Police Commissioner Deepak Pandey यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून की काय मंगळवारी पोलिस आयुक्त हद्दीत केवळ एकच दुर्मिळ घटना घडल्याची नोंद करण्यात आल्याचे या निमित्ताने बघायला मिळाले.

असाच सोनियाचा दिवस पुन्हा पुन्हा यावा अशी अपेक्षा नेहमी पोलीस व नागरिक करीत असतात. याचे प्रत्यंतर या निमित्ताने सर्वांना बघायला मिळाले. तसेच नुकतीच बहुतांश पोलिस ठाण्याचे पोलीस प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचा हा देखील सकारात्मक परिणाम झाला असावा असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे नवीन टीम प्रमुखांचे एक प्रकारे अभिनंदन करावं असा प्रसंग घडलेला आहे. या दुर्मिळ घटनेचे श्रेय पोलीस आयुक्त पांडे यांना जातेय यात तिळमात्र शंका नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com