वशिलेबाजीमुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ

शासकीय रुग्णालयातील प्रकार
वशिलेबाजीमुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लसींचा चा साठा संपल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात ( District Hospital ) लसीकरण केंद्रावर ( Vaccination Center ) आज (दि.१५) काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वशिलेबाजीमुळे ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनाच लस ( Corona Vaccine) मिळाली असल्याने नोंदणीकृत नागरिकांना लस मिळाली नाही त्यामुळे नागरिकांनी येथील कार्यप्रणालीवर नाराजी वर्तवली आणि काही काळ येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण करणे हे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयातील केंद्रावर पहिल्यापासून लस घेणाऱ्यांची गर्दी पहावयास मिळते. दरम्यान, केंद्रातील लशींचा साठा संपल्याने लसीकरण बंद झाले होते. तासनतास उभे राहूनही लस न मिळाल्याने अनेकांनी नाराजी वर्तवली तर काहींनी वाद घातला.

नोंदणी करून आलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देणे आवश्यक असते. मात्र काही नागरिक नोंदणी न करताच केंद्रावर येऊन लस घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे तेथे नित्याचेच वाद होत आहे. तसेच केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे वशिल्यानुसारही लसीकरण होत असल्याने नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com