सातपूर । Satpur (प्रतिनिधी)

औद्योगिक विकासासाठी लगतच्या प्लॉटची मागणी केल्यानंतरही एमआयडीसीच्या मुख्यालयाने हेतुपुरस्सर डावलुन व्यवसायिक असलेला प्लॉट परस्पर औद्योगिक करून वाटप करण्याचा घाट घातलेला आहे.

हे प्रकरण अन्यायकारक असल्याचा आरोप उद्योजक नंदकुमार कर्डक यांनी पत्रकार परिषदेत केला.

औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू असल्यास विस्तारीकरणासाठी अग्रक्रमाने प्लॉट देणे ची तरतूद आहे. नंदकुमार कर्डक यांच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील ए. 24 प्लॉट लगतच पी. 27 हा प्लॉट होता. 2008 साली अर्ज करुन प्लॉटसाठी मागणी नोंदवली होती.

मात्र त्याठिकाणी हेलिपॅड आरक्षण केल्या करून तो प्लॉट मिनिटी मध्ये वर्ग करण्यात आला त्यानंतर अचानक हेलिपॅड रद्द करून औद्योगिक प्लॉट करून वाटप प्रक्रिया राबवली गेल्याचे निदर्शनास आले ही बाब अतिशय गंभीर असून ही अन्यायकारक आहे.

याबाबत सर्व स्तरावरून न्याय मागण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नंदकुमार कर्डक यांनी सांगितले.

औद्योगिक संघटनांच्या पाठबळ याबद्दल विचारले असताना संघटना केवळ नावापुरतेच राहिले आहेत. प्लॉट मिळवण्या पुरतेच पदाधिकारी आहेत उद्योगांच्या प्रश्नांबाबत पदाधिकार्यांना यातील काहीच माहिती नाहीये परस्परांचे पाय ओढण्यात राजकारणात ते व्यस्त असल्याचे सांगून त्यांच्याकडून मदतीबाबत हतबद्धता कर्डक यांनी व्यक्त केली.