
पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपालिकेची मुदत पुढील महिन्यात संपत आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहरात आगामी निवडणूक (election) ग्रामपालिकेची होणार की ही संभ्रमावस्था कायम आहे.
त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) ऑक्टोबर, डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या तसेच नव्याने स्थापन होणार्या ग्रामपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदार यादी (voter list) प्रसिद्ध करण्यात आली. यादी प्रसिद्ध होताच पिंपळगाव बसवंत शहरातील सर्व प्रभागनिहाय याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचे पुढे आले. त्यामुळे जवळपास चोवीस नागरिकांनी तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar Sharad Ghorpade) शेवटच्या दिवशी लेखी हरकती नोंदविल्या आहेत.
राज्यातील ऑक्टोबर, डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या ग्रामपालिकेच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणूक कार्यक्रम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रभागनिहाय रचना जाहीर झाली. ग्रामपालिकेच्या अंतिम आरक्षणावर (reservation) देखील शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणूक आयोगाकडून नुकतीच दि.13 ऑक्टोबर रोजी ग्रामपालिका निवडणुकीची (Municipal election) वार्ड निहाय मतदार प्रसिद्ध करण्यात आली.
त्या यादीत अनेक रहिवासी असलेल्या नागरीकांची वॉर्डनिहाय नावे बदलली गेल्याने मोठा घोळ निर्माण झाला. दि.18 रोजी हरकती घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी निफाडचे (niphad) तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे लेखी स्वरूपात हरकती नोंदविल्या आहेत. शहरातील अनेक प्रभागातील मतदारांचे वार्ड उलट सुलट झाल्याने अनेकांनी या याद्यांबाबत आपला रोष व्यक्त केला.
निफाड तहसील कार्यालयाकडे नितीन बनकर, आशिष बागूल, अल्पेश पारख, किरण लभडे, विनायक खोडे, विशाल मोरे, हर्षल जाधव, दीपक विधाते, अंकुश वारडे, गिरीश बिडवई आदींसह चोवीस नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. तातडीने कार्यवाही होणार निवडणूक आयोगाकडून आगामी पिंपळगाव ग्रामपालिका निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदार यादी प्रसिद्ध होताच
अनेकांनी निफाड तहसील कार्यालयात हरकती त्यानुसार पिंपळगाव बसवंतचे मंडळ अधिकारी, गाव कामगार तलाठी कार्यालयासह पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका कर्मचार्यांच्या मदतीने प्राप्त झालेल्या हरकतींच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली. आज शुक्रवार दि.21 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांनी यादी बाबत सतर्कता बाळगल्याने अनेकांनी त्यांचे आभार मानले.
प्रभाग रचनेनुसार यादी हवी रचना चुकीची झाली. नारायण टेंभी रोड आणि जलसा हॉटेल परिसरातील साधारणपणे दोन हजार मतदार वाढले होते. एक नंबर प्रभागातील भिडे नगरातील 70 टक्के मतदार पाच नंबर मध्ये स्थलांतर केले होते. एक नंबर प्रभागातील साधारत; दोन-अडीचशे मतदार प्रभाग दोन मध्ये टाकण्यात आले होते. तीन नंबर प्रभागात सहा नंबर प्रभागातील मतदार आले होते. पूर्वीप्रमाणे असलेली प्रभाग रचनेनुसार मतदार यादी पाहिजे.
- किरण लभडे, ग्रा.पं. सदस्य (पिंपळगाव)
यादी दुरुस्त करा निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने त्यानुसार प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र त्या याद्यांमध्ये मोठा घोळ होऊन मतदार राहत असलेले प्रभाग बाजूला आणि भलत्याच प्रभागात मतदारांचे नावे सामविष्ट झाली. हा बदल मतदार याद्यामध्ये झाल्याने संपूर्ण याद्याच बदलल्या गेल्या आहेत. प्रशासनाने हरकतींची दखल घऊन तत्काळ सुधारित मतदार याद्या दुरुस्त करून नागरीकांसाठी प्रसिद्ध कराव्यात.
- अल्पेश पारख, ग्रा.पं. सदस्य (पिंपळगाव)