अपुर्‍या लसींमुळे केंद्रावर गोंधळ

अपुर्‍या लसींमुळे केंद्रावर गोंधळ

म्हाळसाकोरे । वार्ताहर | Mhalsakore

सतरा गावांचे कार्यक्षेत्र व गोदाकाठचे शेवटचे प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) असलेल्या म्हाळसाकोरे केंद्रात अपुर्‍या लसीचा पुरवठा आणि लसीकरणासाठी (Vaccination) नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. यामुळे शेकडो नागरिकांना लसीविनाच माघारी फिरावे लागले...

अनेकांनी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वशिल्याने लसीकरण करून घेतल्याने येथे काही काळ मोठा गोंधळ झाला होता. नियोजन शून्य कारभारामुळे हे आरोग्य केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्डचे (Covishield) 220 डोस उपलब्ध झाले होते. मात्र येथे शुक्रवारी रात्री 2 वाजेपासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी जवळपास 550 नागरिक लस घेण्यासाठी आले होते.

येथे कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही की केंद्रातील अधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे नियोजन नसल्याने उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातला. तर मर्जीतील नागरिकांना वशिल्याने लस दिल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी करीत रांगेनुसार लसीकरण करण्याची मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com