नाशिक । Nashik

सरकारी व खासगी रुग्णालयांकडून बेड उपलब्धतेबाबत पोर्टलवर माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांमध्ये प्रचंड संभ्रमवस्था पहायला मिळत आहे.

रुग्णालयात रुग्ण अॅडमिट झाल्यानंतर त्याची माहीती तात्काळ ऑनलाईन पोर्टलवर अद्यावत करणे सरकारी अन् खासगी अशा सर्वच रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आली आहे. पोर्टलवर माहिती अपडेट न केल्यास महापालिकेकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

करोना स्प्रेड धोकादायक वळणावर पोहचला असून गुणाकाराने पाॅझिटिव्ह रुग्ण वाढत आहे.

संसर्गित रुग्णांची वेगाने होणार्या वाढीमुळे वैद्यकीय सेवा, सुविधां अन् रुग्णांना उपलब्ध होत नसून आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णांची मृत्यू होत असून, महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यास रुग्णालयांचे नावे सांगत बेड उपलब्ध असल्याचे अश्वासित केले आहे.

प्रत्यक्षात तेथे गेल्यावर रुग्णालयांकडून बेड पूर्णपणे भरलेले असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचीही मोठी हेळसांड होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांना विचारले असता त्यांनी हेल्पलाईनद्वारे ऑनलाईन प्रणालीवरुन माहीती दिली जात असल्याचे स्पष्ट केले.

पण ही ऑनलाईन पोर्टलवर अत्यावश्यक असलेली माहीती संबधित रुग्णालय व्यवस्थापनाकडून भरलीच जात नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बेड शिल्लक असल्याचे ऑनलाईनद्वारे दिसते, प्रत्यक्षात रुग्णाला आधीच अॅडमिट केले असल्याने बेड मात्र भरलेला असतो.

त्यातून साराच गोंधळ निर्माण होत असल्याने आता मनपा आयुक्तांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच अशी माहीती त्याच क्षणी अॉनलाईन अद्यावत न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई कऱण्याचे अश्वासित केले आहे.