येवला येथुन एक कोटींचा मद्यसाठा जप्त

दोघांना अटक
येवला येथुन एक कोटींचा मद्यसाठा जप्त

येवला | प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईत अवैधरित्या वाहतूक होत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा मद्य साठा येवला नगर राज्य मार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याजवळ जप्त करण्यात आला आहे .

गेल्या काही महिन्यांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने याच ठिकाणी कारवाई करून असाच मोठा मद्यसाठा जप्त केला होता उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईने अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे शनिवार दिनांक २४ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या पथकाने येवला पथकाच्या मदतीने येवला कोपरगाव राज्य मार्गावरील टोल नाका परीसरात सापळा रचून मुद्देमालासह एक ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथून ट्रक क्रमांक UP 82 T 9077 या मालवाहतूक वाहनातून शौचालय बांधणीसाठी लागणाऱ्या सिरामिक भांड्यांच्या आडोशाला ठेवलेल्या गवतामध्ये गोवा राज्यातच विक्रीची परवानगी असलेला विदेशी मद्यसाठा अवैधरित्या इतर राज्यात विक्री साठी उत्पादन शुल्क चुकूवून वाहतूक केला जात होता .

उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक पथक तयार केले होते या पथकात उत्पादन शुल्क निरीक्षक आर् एम फुलझळके, सहाय्यक निरीक्षक भरारी पथक एच एस रावते, सहाय्यक निरीक्षक ए पी पाटील, व्ही ए चौरे येवला निरिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचून भगवांनदास धनसिंग कुशवाह (४१) विनोद फुलसिंग कुशवाह (३६) दोघे राहणार राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर अवैद्य मद्याची वाहतूक करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात असून या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभाग तपास करत आहे उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईसाठी विभागीय उपायुक्त ओहोळ यांचे मार्गदर्शन लाभले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com