
पेठ | Peth
नगर पंचायतीच्या (Nagar Panchayat) शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील तुंबलेल्या नालीत पाय घसरून पडल्यामुळे पेठ (Peth) आगरातील कंडक्टरचा (conductor) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुना बसस्टॅण्ड व पंचायत समिती समोरील चौकात नगर पंचायतीच्या शॉपींग कॉम्प्लेक्स समोर तुंबलेल्या गटारीत पेठ आगरात कंडक्टर म्हणून कार्यरत असणारे यशवंत जिवला लहारे (५०) वर्ष हे पाय घसरून पडले.
त्यानंतर ते बराच वेळ या गटारीत पडून होते. हा प्रकार परिसरातील युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी लहारे यांना तपासून त्यांना मृत घोषित केले.
मुळचे कळमुस्ते येथील रहिवाशी असलेले परंतु सद्या पेठ शहरातच वास्तव्यास असलेले लहारे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पो. नि . दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार करीत आहेत.