कामगार मोर्चाची सांगता

संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
कामगार मोर्चाची सांगता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरुध्द (Against anti-worker policy )आणि चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी संपाची ( Nationwide Strike )काल नाशकात भव्य मोर्चा काढून सांगता करण्यात आली. बँक, पोस्ट, विमा, प्राप्तीकरसह विविध खात्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कोट्यवधी रुपयांंची उलाढाल ठप्प झाली.

केंद्र सरकारने संसदेमध्ये 21 कामगार कायदे रद्द करुन त्या जागी मंजूर केलेल्या कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात. वीज दुरुस्ती विधेयक रद्द करण्यात यावे. कोणत्याही स्वरुपात सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्यात येऊ नये आणि राष्ट्रीय निर्गुंतवणूक पॉलिसी रद्द करण्यात यावी. आयकर न भरणार्‍या कुटुबांना दरमहा 7500/- रुपयांचे अन्न आणि उत्पन्न सूट देण्यात यावी.

मनरेगासाठी वाढीव वाटप आणि शहरी भागात रोजगार हमी योजनेचा विस्तार करावा. कामगारांसाठी सार्वत्रिक, सामाजिक सुरक्षा प्रधान करावी. अंगणवाडी, आशा, मध्यानभोजन आणि इतर योजना कामगारांसाठी वैधानिक किमान वेतन आणि सामाजिक लोक संरक्षण देण्यात यावे. पेट्रोलियम उत्पादनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात आणि किंमती वाढीला अटकाव करण्यासाठी उपचारात्मक उपाय करावेत.

कंत्राटी कामगार योजनेचे नियमितीकरण आणि समान कामासाठी समान वेतन देण्यात यावे. जुने पेन्शन योजना पूर्ववत करण्यात यावी. रोजगाराभिमुख धोरणे राबवा. गॅस, डिझेल, पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रद्द करा. शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा, दर्जेदार व मोफत शिक्षण व्यवस्था राबवा, तसेच नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा. या मागणीसाठा हा संप पुकारला होता. या संंपाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी गोल्फ क्लब मैदान येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर समारोप झाला.

या मोर्चात राजू देसले, व्ही. डी. धनवटे, नामदेव बोराडे, दत्तात्रय गायधनी, सुनीता कुलकर्णी, सखाराम दुर्गुडे, माया घोलप, कृष्णा शिंदे, चित्रा जगताप, मिना आढाव, बाबासाहेब कदम, अरुण म्हस्के, प्रमोद केदारे, सुवर्णा मेतकर, भीमा पाटील, डी. बी. जोशी, भाऊसाहेब शिंदे, दत्तू तुपे, शाहू शिंदे, स्वामिनी बेंडकुळे, निवृत्ती कसबे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com