
मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon
आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology) शेतकर्यांपर्यंत (farmers) पोहोचवण्यासाठी मालेगाव (malegaon) उपविभागातील मालेगाव, सटाणा (satana) व नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) कृषी संजीवनी योजनेंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेंतर्गत उपविभागातील 412 गावांमध्ये कृषी विद्यापीठ (University of Agriculture), कृषी विज्ञान केंद्र (Center for Agricultural Sciences) व कृषी विभागाच्या (Department of Agriculture) माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिक, शेतकरी मेळावे, शेती शाळा व शिवार फेर्यांद्वारे दिलेल्या प्रात्यक्षिक व तांत्रिक माहितीचा उपयोग शेतकर्यांनी आपल्या शेतात करून उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे (Sub-Divisional Agriculture Officer Dilip Deore) यांनी केले आहे.
मालेगाव तालुका (malegaon taluka) कृषी कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची जयंती साजरी करण्यात येऊन स्व. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी दिनानिमित्त कृषी विभागाच्या 25 जून ते 1 जुलैदरम्यान राबवण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. त्यानिमित्त कृषी व्यवसाय तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालय (College of Agricultural Business Technology Management) आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे (Group Development Officer Jitendra Deore) व कृषी अधिकारी भास्कर जाधव (Agriculture Officer Bhaskar Jadhav) यांनी तालुक्यातील गटांमार्फत राबवावयाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत मालेगाव येथील कृषी व्यवसाय तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. विश्वजित शिंदे यांनी सोयाबीन बिजोत्पादन प्रकल्पाबाबत तर तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी पीकविमा, खरीप हंगामातील विविध योजना व पोक्रा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
पिकावरील कीड, रोड सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प योजनेत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे किडीची ओळख होण्यासाठी खरीप हंगामात कपाशी, मका प्लॉट भेटी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी दिली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.