पंचायत समितीतून पंतप्रधान आवास योजनेचा संगणक चाेरला

पंचायत समितीतून पंतप्रधान आवास योजनेचा संगणक चाेरला
प्रातिनिधिक फोटो

नाशिक | Nashik

त्र्यंबक राेडवरील (Trimbak Road) पंचायत समिती (Panchayat Samiti) आवारात असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यालय फोडून चोरट्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा संगणक (Computer) चोरून नेला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. सुजितकुमार कुलकर्णी (रा. त्र्यंबक रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. १८ जुलैला चोरट्यांनी पंचायत समिती आवारातील प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयातील संगणक ऑपरेटर कक्षाच्या दरवाजाचे ग्रील वाकवून चोरी केली.

कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी संगणकासह दोन सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) असा सुमारे २० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात तीन चोरट्यांनी हे कार्यालय फोडल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घोरपडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com