घरकुलांची कामे लवकर पूर्ण करा- भुजबळ

घरकुलांची कामे लवकर पूर्ण करा-  भुजबळ

येवला । प्रतिनिधी Yeola

अमृत महाआवास अभियाना( Amrit Mahaavas Abhiyan)अंतर्गत येवला तालुक्यात सुमारे 6500 हून अधिक घरकुलांचे काम सुरू आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal ) यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येवला संपर्क कार्यालयात अमृत महाआवास अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, गटविकास अधिकारी अन्सार शेख, शहर अभियंता जनार्दन फुलारी यांच्यासह विविध गावांचे सरपंच व लाभार्थी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास यासह इतर योजनांच्या माध्यमातून येवला तालुक्यात 6500हून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट आहे. घरकुल लाभार्थ्यांना जोडरस्ते, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टीम इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com