...तर स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नाही; युवक राष्ट्रवादीचा इशारा

...तर स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नाही; युवक राष्ट्रवादीचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीच्या (Smart City) नावाखाली शहरात खोदलेले रस्ते (Raste) पूर्ववत करावे अन्यथा शहरात स्मार्ट सिटीचे एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP youth) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) व त्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Sumant More) यांना निवेदनाद्वारे दिला...

नाशिक शहरातील (Nashik City) चांगले रस्ते खोदण्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडकडून सुरु आहे. एमजी रोड (MG Road) येथील एकही खड्डा नसलेला रस्ता गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांच्या नावाखाली खोदण्यात आला.

गेल्या आठवड्याभरापासून त्याचे काम थांबल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे. गंगाघाट (Gangaghat) शेजारील रस्ता पावसाळी गटार व पाईपलाईनकरिता खोदण्यात आला होता. या रस्त्याकरिता आठ महिन्याहून अधिक कालावधी लागला.

या रस्ता सद्यस्थितीत मुरूम टाकून बुजविण्यात आला आहे. पावसामुळे या परिसरात चिखल साचले आहे. गंगाघाट परिसर भाविकांनी गजबजलेला असल्याने विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे भाविकांची गैरसोय होत आहे.

नाशिक शहरातील विविध ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आलेले रस्त्यांचे काम तातडीने करण्यात येऊन रस्ते पूर्ववत करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिक शहरातील एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष जय कोतवाल, बाळा निगळ, विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, निलेश भंदुरे, गणेश पवार, कल्पेश कांडेकर, नवराज रामराजे, किरण पानकर, राहुल पाठक, भालचंद्र भुजबळ, अथर्व खांदवे, तेजस शिंदे, ओमकार बेंद्रे, निरंजन पगार, दीपक कुलकर्णी, गणेश गरगटे, प्रणव पानकर, कुणाल घसते, बाळू फसटे, नीरज काळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.