कालव्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

उत्तर नगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम (Nilavande canal work) डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकर्‍यांना (farmers) पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा (Review of work) घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत (mumbai) झाली. यावेळी खा. सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande), महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Additional Chief Secretary of Revenue Department Dr. Nitin Karir), जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर (Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Water Resources Department), जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) उपस्थित होते.

निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम 85 टक्के तर उजव्या कालव्याचे काम 72 टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या दोन्ही काम पूर्ण करून या भागातील शेतकर्‍यांना (farmres) पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

नगर जिल्ह्यातील व सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) सुमारे 83 गावांतील नागरिकांना या पाण्याचा लाभ होणार असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्यासंदर्भात सर्वे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनीबाबत व श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली. खा. लोखंडे यांनी मतदारसंघातील कामांसाठी निधी देण्याची मागणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com