वेलनेस सेंटरचा मार्ग मोकळा

जागेचा करारनामा करण्याचे मुद्रण संचालनायाचे आदेश
वेलनेस सेंटरचा मार्ग मोकळा
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

केंद्रिय अधिकारी, कर्मचारी (Central Officer, Staff) तसेच सेवानिवृत्त केंद्रीय अधिकारी (Retired Central Officer), कर्मचारी यांच्या आरोग्य योजनेच्या (Health plan) निगडीत असलेले वेलनेस सेंटर नाशिक (Wellness Center Nashik) येथे व्हावे यासाठीच्या खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. वेलनेस सेंटरच्या मान्यता विषयीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता गांधीनगर प्रेस वसाहतीमधील (Gandhinagar Press Colony) जागेत प्रत्यक्ष वेलनेस सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

याविषयीचा सीजीएचएस विभागाशी (CGHS Department) भाडे करारनामा (Rental agreement) करण्यासाठीचे आदेश आज केंद्र सरकारच्या आवासन, शहरी आणि मुद्रण संचनालयाने (Central Government Housing, Urban and Printing Directorate) त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या गांधीनगर प्रेस प्रशासनाला दिले आहेत. येत्या काही दिवसातच प्रस्तावित जागेचा ताबा प्रेस प्रशासनाकडून सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम विभागाला (Department of Central Government Health Scheme) मिळणार आहे. यामुळे केंद्रीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांची वेलनेस सेंटर विषयीची प्रतिक्षा संपल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि पेंशनधारक कुटुंबियांची संख्या सुमारे पस्तीस हजार इतकी असून त्यांच्या कुटुंबियांसह लाभार्थांची संख्या जवळपास लाखभर आहे. केंद्र शासनाच्या सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांना सीजीएचएस या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिक येथे वेलनेस सेंटर नसल्याने त्यांना मुंबई, पुणे येथे उपचारासाठी जावे लागत होते.

त्यामुळे रूग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नाशिक येथेच सीजीएचएसचे वेलनेस सेंटर व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने नाशिक येथे वेलनेस सेंटरला अखेर मान्यता दिलेली आहे . वेलनेस सेंटरसाठी गांधीनगर प्रेस वसाहतीमधील जागेची मागील महिन्यात निश्चित करण्यात आली होती.

गांधीनगर येथील प्रस्तावित जागा ताब्यात घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सीजीएचएस विभागाचे प्रयत्न सुरू होते. वेलनेस सेंटरसाठी सीजीएचएसला जागा भाड्याने देण्याविषयीचा निर्णय केंद्र सरकारच्या मुद्रण संचनालयाचा निर्णय झाला असून प्रत्यक्ष करारनामा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतेच याविषयीचे अधिकृत पत्र केंद्रसरकारच्या मुद्रन मंत्रालयाने त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या गांधीनगर प्रेस प्रशासनाला दिले आहे.

अटी, शर्तीचा सहभाग करून लवकरात लवकर गांधीनगर प्रेस वसाहतीमधील प्रस्तावित जागा सीजीएचएसला वेलनेस सेंटर करीता भाडेतत्वावर देण्यासाठी भाडे करारनामा करण्याचे आदेश मुद्रण संचनालयाने दिले आहेत. प्रथम तीन वर्षाकरीता जागा भाडयाने देण्यात येणार असून त्यापुढे करारात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे गांधीनगर येथील प्रस्तावित जागा येत्या काही दिवसांतच सीजीएचएसच्या ताब्यात मिळणार असून लगेचच या जागेत प्रत्यक्ष वेलनेस सेंटर सुरू होणार आहे. वेलनेस सेंटरची प्रतिक्षा संपत आल्याने केंद्रीय अधिकारी कर्मचारी, तसेच पेंशनधारक अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.