16 गाव योजनेची कामे वेळेत पूर्ण करा : भुजबळ

16 गाव योजनेची कामे वेळेत पूर्ण करा :  भुजबळ

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

लासलगावसह (lasalgaon) 16 गाव पाणीपुरवठा योजनेच्या (water supply scheme) कामाला गती देऊन ती वेळेत पूर्ण करावी अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केल्या आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाधरण डी., (Collector Gangadharan d.) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Chief Executive Officer Leena Bansod), सरपंच जयदत्त होळकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ना.भुजबळ यांनी आढावा बैठकीत (Review meeting) लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाभार्थी गावांना भीषण पाणीटंचाईला (water scarcity) सामोरे जावे लागत आहे.

यासाठी लासलगाव (lasalgaon) येथे महिलांनी आक्रोश हंडा मोर्चा, लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने आमरण उपोषण, टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपोषण या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत भीषण पाणीटंचाईवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई (water scarcity) आहे. मुबलक पाणी असून देखील वारंवार पाईपलाईनला गळती लागणे, विद्युत पुरवठा खंडित (Power outage) होणे यामुळे मुबलक पाणी असुन देखील पाणीपुरवठा करणे जिकरीचे झाले आहे. या योजनेतील लाभार्थी गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून या योजनेच्या दुरुस्तीची कामे व गावाचा पाणीपुरवठा वेळेत पूर्ण करावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टॅकर द्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.

सध्या लासलगाव, पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर, कोटमगाव या लाभार्थी गावांमध्ये तब्बल दोन आठवड्यानंतर नळाला पाणी येत आहे. पवित्र रमजान महिन्यात कधी नव्हे एवढ्या भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

Related Stories

No stories found.