आढावा बैठकीत नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवारांची आढावा बैठक
आढावा बैठकीत नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) सर्वच विभागाच्या आधिकारी वर्गाची आढावा बैठकीचे (Review meeting) आयोजन केले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रमुख केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा आदिवासी विकास आघाडीचे (BJP Tribal Development Front) जिल्हा अध्यक्ष एन. डी. गावित (n.d. gavit), भाजपा तालुकाध्यक्ष रमेश थोरात, सुनील भौये, जगु कानडे, भरत भौये, भास्कर चौधरी, सचिन महाले, हेमराज धुम, शाम पवार आदी उपस्थित होते. बैठकीत अधिकार्‍यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने तालुक्यातील समस्या सुटतील की नाही ही अपेक्षाच फोल ठरली.

त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध असलेल्या अधिकार्‍यांवर रोष व्यक्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली. तालुक्यातील विकास कामांचा सुमार दर्जा पाहून बैठक चालु असतानाच काही कर्मचारी चालु असतानाच निघुन जात होते. त्यामुळे अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले. या तालुक्यात चांगली कामे करून दाखवा.

पोटाची आग भडकली की माणसाची माथी भडकतात, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. या तालुक्यात दुष्काळी परीस्थिती (drought conditions) निर्माण झाली आहे. लोक कामच्या शोधात दिंडोरी (dindori), निफाड (niphad), पिंपळगाव (pimpalgaon) या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. त्यांना तालुक्यातच काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सर्वसामान्य माणूस नैसर्गिक संकटात सापडला आहे.

त्याला आधाराची गरज आहे. उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची भयंकर समस्या निर्माण होणार आहे. तालुक्यातील वैदयकिय सेवा (Medical service) अतिशय बिकट झाली आहे. तसेच तालुक्यात बोगस बंगाली डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नागरीकानी केली या सर्व समस्या तालुक्यात भेडसावत आहे.

तालुक्यातील विकासकामांचा सुमार दर्जा पाहुन डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. तालुक्यात चागली कामे करुन दाखवा, अशी तंबी त्यांनी अधिकार्‍यांना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोंबस्त होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com