बॅकलॉग परीक्षेत अडथळा आल्यास करता येणार तक्रार

Online exam
Online exam

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या चुका आता अंतिमपूर्व वर्षातील बॅकलॉगच्या परीक्षेत टाळण्यासाठी ऑनलाइन प्रणालीत सुधारणा केली आहे.

शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी आल्यास त्यांनी त्यांच्या 'स्टुडंट लॉगइनमध्ये' आठ पर्यायांपैकी एक पर्याय निवडून स्व:ताची तक्रार नोंदवू शकणार आहेत.

मंगळवारपासून पुणे विद्यापीठाची अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग व श्रेणी सुधारची परीक्षा सुरू झाली आहे. अंतिम वर्ष परीक्षेत रोज तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी हैराण झाले होते. त्याची तक्रार करण्यासाठी हेल्पडेस्कला फोन करत होते, पण तेथे फोन लागत नव्हता, लागला तरी व्यवस्थित उत्तर मिळत नव्हते.

त्यामुळे विद्यार्थ्यांना एका तासाची परीक्षा पूर्ण करण्यासाठी चार ते पास तास प्रयत्न करावे लागत होते. विद्यापीठाच्या या कारभारावर टीका झाल्याने व ऑनलाइन परीक्षेतील त्रुटी समोर आल्याने यात सुधारणा करण्यात आली आहे.

अंतिम वर्ष परीक्षेत बहुतांश तक्रारी या लॉगइन न होणे, वेगळ्या विषयाचा पेपर येणे, पेपर सबमीट न होणे यासह इतर अडचणी येत होत्या. त्याचाच विचार सुधारणा करताना केला आहे.

बॅकलॉग किंवा श्रेणी सुधार परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी त्यांच्या स्टुडंट लॉगइनमध्ये जाऊन "ऑनलाइन एक्‍झाम ग्रेव्हेयन्स' यावर क्‍लिक केल्यास विद्यार्थ्यांना त्यांना येणाऱ्या अडचणींचे पर्याय दिसणार आहेत.

त्यात लॉगइन न होणे, वेगळ्या विषयाचा पेपर येणे, अचानक लॉग आउट होणे, रिलॉगीन न होणे, प्रश्‍नांमध्ये आकृती न दिसणे, विषयाबाहेरचे प्रश्‍न येणे, पेपर सबमीट न होणे आणि इतर असे आठ पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी एक पयार्य निवडून तक्रार नोंदविता येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com