जि. प. कार्यकारी अभियंता कंकरेज यांच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जि. प. नाशिक
जि. प. नाशिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) बांधकाम विभाग क्रमांक- १ चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज (Surendra Kankrej) यांच्याबाबतच्या तक्रारींचा सूर वाढतच चालला आहे...

नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी कंकरेज यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे कामकाजाबाबत तक्रार करत त्यांच्या गैरकारभाराची तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्यानंतर आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे कंकरेज यांच्याविरोधात आक्रमक झालेले असतानाच आता आमदार कांदे यांच्या तक्रारीमुळे ककंरेंज यांच्या एकूणच कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषद (Zilla Parishad) वर्तुळात सुरू झाली आहे.

ग्रामविकास विभागाची मंजूर झालेली साडे आठ कोटींची कामे रद्द झालेली असतानाच आता आदिवासी उपयोजनांसह डोंगरी विकास कार्यक्रमाच्या कामांनाही वेळेत कार्यारंभ आदेश न मिळाल्याने ती स्थगित झाली आहे.

विकासकामे स्थगितीबरोबरच रद्द झाल्याने झिरवाळ व खोसकर यांनी कंकरेज यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार खोसकर यांनी नुकतीच आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांची भेट घेत कंकरेज यांना थेट सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली आहे.

तक्रारींचा पाढा सुरू असतानाच आमदार कांदे यांनी कंकरेज यांच्या गैरकारभार व अनियमित कामकाजाची लेखी तक्रार थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. कंकरेज यांच्या विरोधात सुशिक्षित बेरोजगार संघननेच्या देखील लेखी तक्रारी आहेत.

जि. प. नाशिक
Forbes च्या Top 20 आशियाई महिला उद्योजकांची यादी जाहीर, भारतातील तिघींचा समावेश

आर्थिक बाबींसाठी कामांच्या फाईली अडविणे. वेळेत निविदा प्रक्रीया न राबविणे, काम वाटप समितीच्या बैठकीत दुजाभाव करणे, मर्जीतील ठेकेदारांना कामांचे वाटप करणे, कार्यारंभ आदेश मुदतीत न देणे आदींमुळे जिल्हयाच्या विकासकामांना खीळ बसत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

जि. प. नाशिक
घटस्फोटानंतर समांथा, नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र?

त्यामुळे कंकरेज यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी आमदार कांदे यांनी पत्रात केली आहे. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com