रास्ता रोको करणाऱ्या पालकांवर गुन्हा

रास्ता रोको करणाऱ्या पालकांवर गुन्हा
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वडाळारोड (Wadalaroad) भागातील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट (Jumma Masjid Charitable trust) अर्थात जेएमसीटी (JMCT) इंटरनॅशनल स्कूलच्या (International School) पालकांनी एक तास रस्ता रोको आंदोलन करून संचालकांनी अचानक फी वाढ केल्याचा निषेध केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडाळारोड भागातील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात जेएमसीटी इंटरनॅशनल स्कूलच्या पालकांनी फी वाढीच्या निषेधार्त विना परवानगी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करून पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने व पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दस्तगीर उस्मान शेख (रा.अमरधाम रोड), रियाजउद्दिन फारुकउद्दिन बागवान (रा. आयशा हाइट्स (aisha hights) अजमेरी कॉलनी नाशिक), फहीम शेख (रा.बागवानपुरा, जुना नाशिक),

नालिया बागवान, उजमा बागवान (रा.फ्लॅट नं.2730 हरी नगरी सोसायटी, बागवानपुरा नाशिक), गुलाम चांद शेख (रा.नायकवाडी पुरा, जुने नाशिक, अजमेरी मशिदीजवळ, नाशिक), फिरोज शेख (रा.नायकवाडी पुरा, अजमेरी मशिदीजवळ, नाशिक) या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळू गिते करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com