पाथर्डी फाट्यावर आंदोलन; मराठा आंदोलकांवर गुन्हे

पाथर्डी फाट्यावर आंदोलन; मराठा आंदोलकांवर गुन्हे

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

छावा क्रांतीवीर सेना (Chhava Krantiveer Sena) नाशिक व मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कुठल्याही पूर्वपरवानगी शिवाय हे आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच आपत्ती व्यवस्थापक कायद्याचा भंग केल्यामुळे पोलीसांत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलनास बसले असून त्यांना राज्यसरकारने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने त्या निषेधार्थ पाथर्डी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी अंबड पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्व कार्यकर्त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या आंदोलनात आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, नितीन दातीर, दिनेश नरवडे, सागर जाधव, कल्पेश पाटील, राम पाटील, सुमित जाधव, मयुर शिंदे, आकाश कांनकुटे, निलेश धोंडगे, राकेश जोरी, गोटिराम डेमसे, ज्ञानेश्वर कोतकर, आकाश नगबाल आदी कार्यकर्ते सहभागी होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com