मराठा आरक्षण रद्द : समाजभावना दुखावल्या प्रकरणी महंत सुधीरदास यांच्यावर गुन्हा

मराठा आरक्षण रद्द : समाजभावना दुखावल्या प्रकरणी महंत सुधीरदास यांच्यावर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथील महंत सुधीरदास यांच्याविरोधात आज बदनामी आणि शांतताभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियात त्यांनी पोस्ट केली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती...

अधिक माहिती अशी की, मराठा क्रांती मोर्चाच्या पोस्टरवर एक मुलगी आरक्षणासाठी आर्त हाक देताना दिसून येत आहे. या मुलीला टार्गेट करत महंत सुधीरदास यांनी त्या मुलीचा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत 'ती सध्या काय करते?' अशा शब्दांत लिहिले होते.

यानंतर नाशिकमधील मराठा समाजबांधव यांनी महंत सुधीरदास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, पंचवटी पोलीस ठाण्यात आज सायंकाळी आयपीसी कलम ५०४ अंतर्गत बदनामीकारक पोस्ट आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com