ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ऑक्सिजन गळती दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्तदीपक पांडेय यांनी दिली. ते म्हणाले, ऑक्सिजन गळतीची दुर्घटना वाईट होती. या दुर्घटनेला जबाबदार कोण याचा तपास होणे गरजेचे आहे.

हे रुग्णालय भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com